चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं.