आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते. ...
भगवान महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल ...
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आदर करण्याचे सुचविले आहे. ज्येष्ठांचा आदर केल्यामुळे लहानांवर संस्कार होतात. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांची कदर करण्याची गरज आहे. ज्येष्ठांचा आदर करून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यानुसार जीवनात वाटचाल केली तर जीवनाला अर्थ ये ...
तीर्थकार शांतीनाथ भगवान हे भक्तांचे तारणहार आहेत. त्यांच्याजवळ चक्रवर्तीचे वैभव होते. त्यांनी तपस्या करुन तीर्थकार पद प्राप्त केले. महापुरुषांच्या मार्गदर्शनाने मन, काया, वाचा यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सापडतो. ...
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे. ...
जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो. ...
महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. ...
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. ...