जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. Read More
एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन महिला उद्योजक शुभदा चांदगुडे यांनी केले. ...
राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त परभणीत आयोजित राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ...
सूर्योदय समयी मंगलमय वाद्यात ढोलताशाच्या गजारात व फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रीगेड, संभाजी ब्रीगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समीती व महाराष्ट्र शासनाच्या वतीने १२ जानेवारी र ...
राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले. ...