स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. Read More
‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. ...
३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...