लीना चंदावरकर यांनी मन का मीत या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मेहबूब की मेहंदी या चित्रपटात राजेश खन्ना सोबत काम केले. या चित्रपटामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या हमजोली, मैं सुंदर हूँ, प्रीतम, रखवाला, मनचली, अनहोनी, सरफरोश, एक महल हो सपनो का यांसारख्या चित्रपटात झळकल्या. लीना या खूप चांगल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ३० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९८० मध्ये ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले. Read More
गोविंदाप्रमाणेच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. या घटनेनंतर त्या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया. ...
अभिनयक्षेत्रात यश मिळत असतानाच वयाच्या केवळ २५ व्या वर्षी लीना चंदावरकर यांचे लग्न सिद्धार्थ बंडोडकरसोबत झाले. सिद्धार्थ हे एका राजकीय कुटुंबातील होते. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली. ...