महाराष्ट्र राज्याचा २०१८चा अर्थसंकल्प शुक्रवारी ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६२ हजार ८४४ कोटी रुपायांचा होता. तर ४५११ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित धरण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पानंतर देशी-विदेशी मद्य महागत असतानाच दूधाची तपासणी करणाऱ्या संचावरील कर हटवण्यात आल्याने ते स्वस्त झाले होते. २०१९मध्ये निवडणुका अपेक्षित असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक अर्थसंकल्प होता, तसाच राज्याचाही अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी तरतुद करावी लागल्याने या आर्थिक वर्षात नेहमीच्या खर्चात कपात करावी लागली होती. या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी करायची झाल्यास किमान २० हजार कोटींची तरतुद करावी लागणार आहे. त्यामुळे वार्षिक योजनेचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा ४ लाख २५ हजार कोटीच्या जवळपास पोहचल्याचाही फटका वार्षिक योजनेसाठीच्या तरतुदीला बसू शकतो. Read More
चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त) दीपक केसरकर हे सिंधुदुर्गचे. त्यांनी आपल्या भागासाठी न ...
राज्यातील २० लाख आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणून सहा कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना खासगी सहभागातून करण्यात येणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसं ...
ई-वाहनांची (इलेक्ट्रिक वाहने) निर्मिती करणा-या कंपन्या आणि ही वाहने खरेदी करणा-या ग्राहकांना थेट अर्थसाहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. यामुळे पर्यावरण अनुकूल इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची आशा आहे. ...
राज्यातील १४५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘ई-नाम’ या राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली. यामुळे शेतक-यांना उत्पादनांची आॅनलाइन विक्री करता येणार आहे. ...
नाविन्याशिवाय विकास होत नाही, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. हा निकष शासन चालविणाºयांना लावायला हवाच ना? कारण त्यांच्या आर्थिक धोरणानुसार गुंतवणुकीचे मार्ग खुले होतात. त्यातून रोजगाराची निर्मिती होते आणि दरडोई उत्पन्न वगैरे वाढून लोककल्याणाचा ‘इंडेक ...
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मुंबईत विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ३५० कोटी आणि मिहानसाठी १०० कोटींची तरतूद केली. ...
मुंबई - महाराष्ट्राला विकासाकडे आणि अर्थिक प्रगतीकडे नेणारा हा अर्थंसकल्प आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या व विमुक्त जाती, महिला आदी समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. दिव्यांगाचाही विश ...