Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.