छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. Read More
सीएसएमटीतील कोसळलेल्या हिमालय पुलासंबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातूनच पुलाची तपासणी न करताच अहवाल पाठविल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे ...
मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले. ...
हिमालय पुलाच्या दुर्घटनेस स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाईचा खोटा अहवाल कारणीभूत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आॅडिटरमार्फत केलेल्या अन्य ३८ पुलांच्या आॅडिटबाबतही संशय व्यक्त होत आहे. ...