जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या. ...
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़ ...
राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील शासकीय धान्य घोटाळ्यात महसूल प्रशासनाकडून संबंधित कंपनीची बाजू मांडण्यात येत असल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे़ ...
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात ८ हजार विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली आहे़ ...
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़ ...
अवैध रेतीउपसा करणाऱ्या माफियांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी, रेती उपसा मात्र जोरात सुरु असल्याचे दिसून येते़ गोदावरीतील गाळ काढण्याबरोबर वाळूचाही उपसा करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, प्रशासनाने कलम १४४ लावलेले घाटही त्यातून सुटल ...