शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत ...
नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. ...
वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...
काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या ...
गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावर ...
नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. ...
आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. ...
शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व ...