माणिकदौंडी (ता. पाथर्डी): राज्यभर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...
शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली. ...
दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर ...
कल्याण निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे रखडलेले काम पूर्ण झाल्याशिवाय बडेवाडी येथील टोलनाका सुरु करण्यात येवू नये, या मागणीसाठी खरवंडी चौकात १ आॅगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...
पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. ...
पाथर्डी : तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे. ...