Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.