‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे. Read More
संतोष हराळे यांनी याआधी दौंड तालुक्यात शौचालय दत्तक योजना सुरू केली होती. त्या योजनेत 52 हजार शौचालये बांधण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भोर येथे आल्यावर ‘कुपोषित मूल दत्तक योजने’ची संकल्पना त्यांच्या मनात रुजली. ...
बालविवाह हा प्रश्न फक्त ग्रामीण भागात आहे का? - तर नाही. आकडेवारी सांगते की, शहरी भागातही बालविवाह वाढत आहेत. त्याची कारणं काय तर? समाजाचा दबाव, जुनाट प्रथांमुळे आईवडिलांच्या जिवाला लागलेला घोर आणि आर्थिक चणचण. परिणाम? अल्पवयीन लग्न आणि मातृत्व ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 19 गावे जंगलाबाहेर नवीन ठिकाणी वसविण्यात आली, त्याला आता बराच काळ लोटला. लोकांना घरे मिळाली, रस्ते झाले, वीज आली, पाण्यासाठीची पायपीट कमी झाली, पण त्यांचे मन या ठिकाणी कधी रुजलेच नाही. पुनर्वसन झालेली गावे पुन्हा जंगलात ...
जंगलाच्या बाहेर पुनर्वसन झाल्यावर गावांचा कुपोषणाचा प्रश्न तर मिटला, पण दुषित पाण्यानं अनेक आजार पाठीशी लागले. जंगलात मका आणि जवारीची भाकरी मिळायची. इथे रेशनचा गहू अन् तांदूळ. तो कसा पचणार? आदिवासींच्या घराघरात मोहाची दारू तयार व्हायची, पण विकतच् ...