जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
Sharad Pawar Reaction On Satyapal Malik Statement: आपल्या सैनिकांची जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ...
Satyapal Malik On Pulwama Attack: सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्याला केंद्रीय गृहमंत्रालय आणि राजनाथ सिंह यांनी नकार दिला, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. ...