जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...
‘जैश-ए-मोहम्मद’ने केलेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी त्याच गावातील रहिवासी असलेल्या एका इसमास व त्याच्या मुलीला अटक केली. ...