समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी शाळेतील मुला मध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवक शंकर सोनेजा यांनी पोलीस अधिकारी समीर वानखडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ...
मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले. ...