समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी कॉर्डिलिया क्रूझ केस या मथळ्याखाली एक बातमी व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. ज्यात आरोपी तिरोडकर याने खासगी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर माध्यमांवर तथ्यांची पडताळणी न करता तो अपलोड केल्याने माझी बदनामी झाल्याचा दा ...