गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.