शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटनाच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात ...
शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व ...
शेवगाव-गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.१९) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घ ...
शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे. ...