श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.