सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz Read More
Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे. ...