श्रीलंकेतील या ठिकाणांना पाहून मिळेल कधीही न विसरता येणारा अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:04 PM2018-09-14T13:04:41+5:302018-09-14T13:05:40+5:30
येथील काही ठिकाणांचं सौंदर्य पाहून पर्यटक आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला जाणून घेऊ श्रीलंकेतील अशाच खास १० ठिकाणांबाबत...
श्रीलंका आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखला जातो. त्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. पण त्यातल्या त्यात येथील काही ठिकाणांचं सौंदर्य पाहून पर्यटक आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला जाणून घेऊ श्रीलंकेतील अशाच खास १० ठिकाणांबाबत...
१) एला
(Image Credit : traveltriangle.com)
डोंगरदऱ्या आणि जंगलांच्या मधून जाणारी रेल्वे आणि बाहेरचा सुंदर नजारा तुम्हाला कधीही न विसरता येणारा अनुभव देतं.
२) नुवारायलिया
(Image Credit : YouTube)
नुवारायलिया डोंगरातून निघालेली केलानी नदी कोलंबोची लाइफलाइन मानली जाते. नुवारायलिया समुद्र सपाटीपासून २ हजार मीटर उंचीवर वसलेलं एक शहर आहे. नेल्लु पुष्प जे १४ वर्षातून केवळ एकदाच फुलतं. या फुलाच्या नावावरुन या जागेचं नाव नुवारायलिया पडलं आहे.
३) पिन्नावला एलिफन्ट ऑरफनेंज
श्रीलंकेतील या ठिकाणावर तुम्ही एकदा गेलात तर पुन्हा परत येण्याची तुमची इच्छा होणार नाही. कारण हत्ती आणि त्यांच्या पिल्लांची मस्ती बघण्याचा इथल्यासारखा अनुभव कुठेच मिळत नाही.
४) पोलोन्नरुवा
जुन्या ऐतिहासिक गोष्टी बघण्याची मजा काही औरच असते आणि इथे आल्यावर अशा कितीतरी गोष्टी बघायला मिळतील.
५) दमबुला मंदिर
श्रीलंकेतील या मंदिरात तुम्हाला शिल्पकलेचा अजोड नजारा बघायला मिळेल. इथे भगवान गौतम बुद्धांच्या १५० मूर्ती आहेत.
६) अॅडमास पीक
श्रीलंकेतील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे अॅडमास पीक आणि जर तुम्हाला उगवत्या सूर्याची सुंदरता अनुभवायची असेल तर रात्रीच या ठिकाणी ठिय्या मांडा. हे ठिकाण यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा भाग आहे.
७) ओल्ड डच फोर्ट
दुपारच्या वेळी शांततेत वेळ घालवायचा असेल तर ओल्ड डच फोर्टमधून समुद्राला न्याहाळण्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. इथे हा अनुभव तुम्हाला घेता येईल.
८) सिगरिया रॉक
श्रीलंकेला गेलात आणि पाचव्या शतकात तयार करण्यात आलेल्या या सुंदर जागेला भेट नाही दिली तर ही ट्रिप अर्धवट राहिल.
९) म्रिस्सा
म्रिस्सा एक छोटं गाव आहे. येथील बीचमुळे या गावाला वेगळी ओळख मिळाली आहे.
१०) याला नॅशनल पार्क
याला नॅशनल पार्क हे जगातल्या सर्वात वेगवान बिबट्यांचं घर आहे. त्यांना या जंगलात पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यासोबतच इथे खूपकाही पाहण्यासारखं आहे.