भारतातील सर्वात लोकप्रिय सनसेट पॉइंट, रोमॅंटिक डेटसाठी इथे देऊ शकता भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:50 PM2019-02-08T14:50:02+5:302019-02-08T14:50:08+5:30

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही अनेक सनसेट पाहिले असतील. हे सुंदर नजारे पाहून तुमच्याही मनात कधी आलं असेल की, आपल्यालाही कधीतरी पार्टनरसोबत असा सनसेट अनुभवता यावा.

5 Breathtaking Sunset Destinations in India | भारतातील सर्वात लोकप्रिय सनसेट पॉइंट, रोमॅंटिक डेटसाठी इथे देऊ शकता भेट!

भारतातील सर्वात लोकप्रिय सनसेट पॉइंट, रोमॅंटिक डेटसाठी इथे देऊ शकता भेट!

googlenewsNext

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही अनेक सनसेट पाहिले असतील. हे सुंदर नजारे पाहून तुमच्याही मनात कधी आलं असेल की, आपल्यालाही कधीतरी पार्टनरसोबत असा सनसेट अनुभवता यावा. मात्र सर्वात चांगला सनसेट कुठे बघायला मिळेल हे अनेकांना माहीत नसतं. कदाचित तुम्हालाही माहीत नसेल. त्यामुळे आम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय सनसेट पॉइंटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही या सनसेट पॉइंटला व्हॅलेंटाइन डेला जाऊ शकता.  

कर्नाटकचा सनसेट पॉइंट, अगुंबे

(Image Credit : TripAdvisor)

अगुंबेला साऊथमधील चेरापूंजीही म्हटलं जातं आणि हे ठिकाण सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. इथे जोडीदाराचा हात हातात घेऊन डुबत्या सूर्याला बघण्याचा अनुभव केवळ मनालाच नाही तर मेंदूलाही आनंद देणारा ठरेल. घनदाट जंगलांनी घेरलेलं हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळही आहे.   

सनसेट पॉइंट, कन्याकुमारी

(Image Credit : Culture Trip)

या ठिकाणाहून सनराइज आणि सनसेट दोन्ही सुंदर दिसतात. कन्याकुमारीच्या आजूबाजूला अनेक बघण्यासारखी ठिकाणे आहेत. चारही बाजूंनी पाणी तिथून सनसेट बघणे म्हणजे एक अद्भुत नजारा असतो. फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण फारच चांगलं मानलं जातं. कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉकजवळ हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावरून उगवता आणि डुबता सूर्य बघणे एक वेगळाच अनुभव ठरू शकतो. 

जोइदा, कर्नाटक

(Image Credit : www.nativeplanet.com)

कर्नाटकच्या उत्तर कन्नडमधील जोइदा हे ठिकाण फार कमी लोकांना माहीत आहे. पण येथील सनसेट फारच सुंदर आणि आकर्षक असतो. हे ठिकाण सूपा धरणासाठी प्रसिद्ध आहे. हे धरण काली नदीवर आहे. 

टायगर हिल पॉइंट, दार्जिलिंग

दार्जिलिंगचा टायगर हिल पॉइंटही सनसेटसाठी फार प्रसिद्ध आहे. एव्हरेस्टनंतर हिमालयाच्या सर्वात उंच शिखरांपैकी एक म्हणजे कांचनजंगाच्या पर्वताच्या मागून उगवात सूर्य बघणे नेहमीसाठी स्मरणात राहील. 

पॅलोलियम बीच, गोवा

हे ठिकाण गोव्यातील कंकोना परिसरात आहे. हे ठिकाण अर्धचंद्राकार आकृतीत तयार झालं आहे. ताडांची उंचच उंच झाडांनी या ठिकाणाचं सौंदर्य आणखीन खुलतं. या गावात छोट्या छोट्या झोपड्याही आहेत. तेथून सनसेट बघणे फारच आनंददायी ठरू शकतो. 

Web Title: 5 Breathtaking Sunset Destinations in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.