पक्षांसारखं आकाशात उडण्याची इच्छा आहे ? इथे घेऊ शकता स्काय डाइविंगचा थरारक अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:55 PM2018-07-27T12:55:25+5:302018-07-27T12:58:48+5:30
काही लोकांना असं काही तरी साहसी करण्याची फारच आवड असते तर काहींना निदान एकदा तरी हा अनुभव घ्यायचा असोत. पण अनेकांना हा अनुभव कुठे घेता येईल हेच माहीत नसतात. त्यामुळे याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फिरायला जाणे किंवा प्रवास करणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यात तुम्ही वेगवेगळ्या नव्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. मग ते खाण्या-पिण्याचे असो वा अॅडव्हेंचर अॅक्टीविटीचे असो. धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ रिलॅक्स होण्यासाठी हे गरजेचं असतं. कदाचित यामुळे भारतातील टुरिझमचा ग्राफ गेल्याकाही वर्षात फार वाढला आहे. अलिकडे स्कूवा आणि स्काय डायविंगची क्रेझही वाढली आहे. काही लोकांना असं काही तरी साहसी करण्याची फारच आवड असते तर काहींना निदान एकदा तरी हा अनुभव घ्यायचा असोत. पण अनेकांना हा अनुभव कुठे घेता येईल हेच माहीत नसतात. त्यामुळे याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
स्काय डायविंग, सिंपल पॅराशूटचं मॉडर्न रूप आहे. ज्यात एअरक्राफ्टमधून एका ठराविक अंतराहून उडी घ्यायची असते. आणि काही वेळाने आपलं पॅराशूट उघडून खाली उतरायचं असतं. हे करत असताना काही नियमांचं पालन करणं फार गरजेचं असतं. ज्यासाठी काही ट्रेनर्स असतात. अनेक ठिकाणी १ ते २ तासांचं ट्रेनिंगही दिलं जातं. चला जाणून घेऊ कुठे तुम्हाला हा वेगळा आणि तितकाच साहसी अनुभव घेता येईल.
मैसूर, कर्नाटक
स्काय डायविंगच्या बेस्ट डेस्टिनेशनमध्ये मैसूर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. बंगळुरूपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या मैसूरमध्ये स्काय डायविंग कॅम्प्स आहेत. इथे येऊन तुम्ही स्काय डायविंगचा आनंद घेऊ शकता. इथे प्रोफेशनल ट्रेनर्सकडून तुम्हाला २ ते ३ दिवसांचं ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतरच तुम्हाला हे करू दिलं जातं. हवेत पक्षांसारखं उडत आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यात आपलीच एक वेगळी मजा असते.
(Image Credit: www.tripoto.com)
धाना, मध्यप्रदेश
धानामध्ये भारतातील पहिला स्काय डायव्हिंग कॅम्प सुरु झाला होता. इथे तुम्हाला स्टेटिक आणि टॅडेम जम्पचे पर्याय मिळतात. ४ हजार फूटाहून येथील सुंदरता पाहणं तुमच्यासाठी कधीही न विसरता येणारा अनुभव असेल. त्यामुळे धानाला भारतातील सर्वात बेस्ट स्काय डायव्हिंग कॅम्प मानलं जातं.
अॅंबी व्हॅली, पुणे
जर तुम्हाला अॅडव्हेंचरची आवड असेल तर अॅंबी व्हॅलीमध्ये एकदा आवर्जून स्काय डायव्हिंग करावं. ४५ मिनिटांची ही स्काय डायव्हिंग तुम्हाला आयुष्यभरासाठी स्मरणात राहिल. सध्या इथे १० हजार फूटावरून उडी घेण्याची सुविधा आहे.
दीसा, गुजरात
तुम्ही अनुभव घेतलेला असेल किंवा ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी एकदा गुजरातमधील दीसाला नक्की भेट द्यावी. कारण इथेही स्काय डायव्हिंगची खास सेवा उपलब्ध आहे. इथे गुजरात स्पोर्ट्स अथॉरिटी आणि इंडियन पॅराशूट फेडरेशनकडून स्काय डायव्हिंग कॅम्प लावले आहेत.
पॉंडिचेरी
भारताच्या अनेक सुंदर शहरांपैकी एक असलेलं पॉंडिचेरी शहर केवळ स्कूवा डायविंगसाठीच नाही तर स्काय डायविंगसाठीही लोकप्रिय आहे. पॉंडेचेरीमध्ये तुम्हाला स्टेटिक, टॅंडेम आणि एक्सीलिरेटेड प्रकारचे पर्याय मिळतील.