उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारताजवळील स्वस्तात मस्त 6 देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 02:16 PM2018-04-11T14:16:55+5:302018-04-11T14:18:51+5:30

अगदी कमीत कमी म्हणजे ७० रुपयांत तुम्हाला जेवण मिळू शकते आणि ३०० रुपयांपर्यंत राहण्याची सोय होऊ शकते. 

6 cheapest countries to travel from India | उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारताजवळील स्वस्तात मस्त 6 देश 

उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारताजवळील स्वस्तात मस्त 6 देश 

googlenewsNext

या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही कुटुंबियांसोबत कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा 6 देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे अगदी कमीत कमी म्हणजे 70 रुपयांत तुम्हाला जेवण मिळू शकते आणि 300 रुपयांपर्यंत राहण्याची सोय होऊ शकते. 

थायलंड 

पांढ-या हत्तीचा देश म्हणून  असलेल्या थायलंडमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचा तुम्ही चांगला आनंद घेऊ शकता. हा देश सुंदर असण्याबरोबरच भरपूर स्वस्त देखील आहे. थायलंडमध्ये तुम्हाला 300 ते 500 रुपयांत राहण्यासाठी हॉटेल्समध्ये रुम मिळू शकतात. 

कम्बोडिया 

कंबोडियाचं अंकोरवाट मंदिर तर सगळ्यांनाच माहित आहे. जर तुम्ही देखील या प्राचीन मंदिराचं दर्शन घेऊ इच्छिता तर कंबोडिया जाण्याची लगेच तयारी करा. कारण कंबोडियात देखील तुम्हाला 300 ते 1000 रुपयांत राहण्यास रूम उपलब्ध होईल. तसेच हॉटेलमध्ये चांगलं जेवण देखील कमी दरात मिळेल. आणि जर तुम्ही बिअर शौकीन असाल तर ही जागा तुम्हाला अतिशय आवडेल. कारण या कंबोडियात फक्त 15 ते 18 रुपयांत बिअर उपलब्ध होते.

व्हियतनाम

व्हियतनाम देखील एक सुंदर जागा आहे. या देशात फक्त 60 ते 70 रुपयांत व्हियतनामी जेवण मिळतं. ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि व्हियतनाममध्ये राहणं देखील अधिक स्वस्त आहे.

बल्गेरिया

बल्गेरिया दक्षिण-पूर्वी युरोपमधील एक सुंदर देश आहे. बल्गेरियामध्येही तुम्हाला जेवण आणि राहणं अगदी स्वस्त दरात उपलब्ध होईल. बल्गेरियामध्ये तुम्ही अगदी स्वस्तात तुम्ही सुट्टी घालवू शकता.

भूतान

भारताचा शेजारी देश म्हणजे भूतान. या देशात फिरण्यासाठी तुम्हाला बजेटची काळजी करण्याची काहीच गरज नाही. इथले प्राचीन मंदिर नेहमीच आकर्षण असतात. भूतानमध्ये फक्त 100 रूपयांत अगदी स्वादिष्ट जेवण मिळेल. तसेच या देशात राहण्यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च करावा लागेल. महत्वाची बाब म्हणजे भारतातून या देशात जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्टही लागत नाही.

नेपाळ

नेपाळमध्येही तुमचं अगदी स्वस्तात मस्त फिरणं होऊ शकतं. इथे 50 रुपयांपर्यंत तुम्हाला राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तर भारतीय पद्धतीचं जेवणही कमी दरात मिळतं. 
 

Web Title: 6 cheapest countries to travel from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास