पर्यावरण जपण्यासाठी धडपडणारी 7 ठिकाणं. पर्यावरण आणि पर्यटन याचा समतोल कसा राखावा हे यांच्याकडून शिका! -

By admin | Published: June 21, 2017 06:36 PM2017-06-21T18:36:48+5:302017-06-21T18:36:48+5:30

पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोलकसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

7 places to feed the environment Learn from how to balance the environment and tourism! - | पर्यावरण जपण्यासाठी धडपडणारी 7 ठिकाणं. पर्यावरण आणि पर्यटन याचा समतोल कसा राखावा हे यांच्याकडून शिका! -

पर्यावरण जपण्यासाठी धडपडणारी 7 ठिकाणं. पर्यावरण आणि पर्यटन याचा समतोल कसा राखावा हे यांच्याकडून शिका! -

Next

-अमृता कदम

आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा स्वत:ची, आपल्या सामानाची नीट काळजी घेतो. पण आपण जिथे फिरायला गेलो आहोत, त्या ठिकाणाची, तिथल्या निसर्गाची आणि पर्यावरणाचीही आपण तितकीच काळजी घेतो का? सध्याच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास वेगानं होतो आहे. आणि यात बेजबाबदार पर्यटनाचा वाटाही मोठा आहे. आणि म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या उपायात जबाबदार पर्यटन हाही एक उपाय आहे.

पर्यटन करताना, निसर्गाचा आनंद उपभोगताना आपण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं भान बाळगणं गरजेचं आहे. त्यातूनच ‘शाश्वत पर्यटना’ची संकल्पना उदयाला आली आहे. शाश्वत पर्यटनामध्ये पर्यटनस्थळाच्या नैसर्गिक, सामाजिक आणि कलात्मक पर्यावरणाला कोणत्याही पद्धतीनं बाधा उत्पन्न न करणं आणि पर्यटनाचा पर्यावरणावर कमीत कमी दुष्परिणाम होईल हे पाहणं अपेक्षितआहे. शाश्वत पर्यटनाच्या याच संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं 2017 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन वर्षाचं औचित्य साधत वान्डरट्रेल या पर्यटनविषयक आॅनलाइन पोर्टलनं भारतातल्या सात इको-फ्रेंडली पर्यटनस्थळांची यादी दिली आहे. याठिकाणी पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा समतोल कसा साधला जातो हे बघायचं असेल तर या सात ठिकाणी एकदा जावून यायला हवं.

पर्यटनाचा उद्देश असतो तो आनंद मिळवणं. पण आपला आनंद उपभोगताना आजूबाजूच्या पर्यावरणाला जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या पर्यावरणावरच तर अवलंबून असतो. पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पुढाकार घेणारी ही गावं आपल्याला प्रकर्षानं या वास्तवाची जाणीव करुन देतात. 1) उरवू बाम्बू व्हिलेज, वायनाड ( केरळ)

बांबूवर आधारित हस्तोद्योग आणि बांबू हाऊसमधील स्टे यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेलं हे गाव इको-फ्रेंडली पर्यटनासाठीचं एकदम आदर्श उदाहरण आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या बांबूंच्या घरात राहतात, घरगुती पद्धतीचंच जेवण जेवतात. इथल्या हस्तोद्योगांच्या कारखान्याला भेट देतानाच स्थानिक जीवनशैली आणि त्यांच्या जीवनशैलीत असलेलं बांबूचं महत्त्व जाणून घेतात. पर्यटनामुळे या छोट्याशा गावाचा आर्थिक विकासही साध्य होत आहे. जेव्हा केव्हा तुम्ही केरळची ट्रीप प्लॅन कराल, तेव्हा एक-दोन दिवस या गावासाठी राखून ठेवायलाही विसरु नका.

2) शोला शॅक, वायनाड (केरळ)

केरळमधलं अजून एक निसर्गसंपन्न गाव. इथे तुम्ही इथल्या स्थानिक लोकांसोबत कम्युनिटी लिव्हिंगचा अनुभव घेऊ शकता. इथल्या आदिवासी जमातींचं संगीत आणि लोककलांचाही आनंद तुम्हाला घेता येतो. या गावाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक घरात इको-फ्रेंडली टॉयलेट बांधलेलं आहे. पर्यटनातून जो पैसा मिळतो त्यातला बराचसा भाग हा इथल्या आदिवासींच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी वापरला जातो.

 

7)सराई कोठी (मध्य प्रदेश)

इथे वन्यजीव संवर्धनासाठी स्थानिकांची मदत घेतली जाते, त्यांना या कामात सामावून घेतलं जातं. त्यामुळे वनसंपदेचा गैरवापर आणि नुकसानही टळतं.

Web Title: 7 places to feed the environment Learn from how to balance the environment and tourism! -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.