भारतातील अशी 10 ठिकाणं जिथे तुमच्या जाण्यावर आहे बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 11:06 AM2018-04-06T11:06:52+5:302018-04-06T11:10:20+5:30
काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे...
(Image Credit : topyaps.com)
भारत हा साऊथ एशियातील सर्वात मोठा देश आणि जगातला सातवा सर्वात मोठा(क्षेत्रफळाने) देश आहे. भारताला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण आजही भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे...
1) अक्सन चीन, जम्मू-काश्मीर
अक्सन चीन ही भारत आणि चीन या दोन देशातील सर्वात मोठी सीमारेषा आहे. या ठिकाणाला लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल (LAC) असेही म्हटले जाते. हा परीसर जगातील अनेक धोकादायक जागांपैकी एक मानली जाते.
2) भानगढ किल्ला, राजस्थान
राजस्थानातील अलवार जिल्ह्यात भानगढ हा किल्ला आहे. 17 व्या शतकातील हा किल्ला देशातील अनेक प्रसिद्ध हॉन्टेड ठिकाणांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या परीसरात कथित भूतं असल्याची चर्चा नेहमीच होत असते. अनेकांनी इथे भूतं असल्याचं सांगितलं आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी सहसा कुणालाही परवानगी मिळत नाही. पण कुणाला मिळालीच तर अनेक अटींवर परवानगी दिली जाते.
3) निकोबार आयलंड
निकोबार आयलंड हे अजूनही अनटच्ड आहेत. यूनेस्कोने या आयलंडला विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे इथे जाण्यास सर्वसामान्यांना मज्जाव आहे. मात्र केवळ रिसर्चसाठी जात असाल तर आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.
4) चोलमू लेक, नॉर्थ सिक्कीम
चोलमू लेक ही भारतातील सर्वात उंच लेक आहे. ही लेक नॉर्थ सिक्कीममध्ये असून तिथून चीनची सीमा केवळ चार किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी मज्जाव आहे. काही योग्य कारण असल्याशिवाय आणि आर्मीची परवानगी असल्याशिवाय इथे जाता येत नाही.
5) सियाचिन हिमनदी
सियाचिन हे ठिकाण हिमालयात आहे. इथेच भारत-पाकिस्तान सीमारेषा संपते. हा परीसर जगातला सर्वात उंच मिलिट्री पॉईंट आहे. सर्वसामान्य नागरीकांना इथे जाण्यासाठी परवानगी नाहीये.
6) नॉर्थ सेंटिनेल आयलंड, अंदमान
नॉर्थ सेंटिनेल आयलंड हे अंदमान आणि निकोबारचा भाग आहे. इथे काही आदिवासी राहतात. असे म्हणतात की, त्यांना बाहेरील जगाबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे ते बाहेरच्यांना इथे येऊ देत नाहीत. भारत सरकारने इथे जाण्यास बंदी घातली आहे.
7) बस्तर, छत्तीसगढ
बस्तर हा छत्तीसगढमधील एक जिल्हा असून येथील नैसर्गिक सौंदर्य नेहमीच सर्वांना भुरळ घालतं. पण या परीसरात अनेल नक्षलवागी कारवाया होत असतात. त्यामुळे या परीसरात प्रवास करणे धोक्याचे आहे.