पाच दिवसात २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल विनातिकीट प्रवास भोवला: रेल्वेच्या विशेष मोहिमेंतर्गत ८८१ लोकांवर कारवाई
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30
सोलापूर : १ ते ५ जुलैदरम्यान रेल्वेच्या विशेष पथकाने मोहीम राबवून २ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल केला़
Next
स लापूर : १ ते ५ जुलैदरम्यान रेल्वेच्या विशेष पथकाने मोहीम राबवून २ लाख ८२ हजार २७० रुपयांचा दंड वसूल केला़ वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक के़ व्ही़ थॉमस आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक आय़ भास्कर राव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर - वाडी मार्गावर ही मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत ८८१ जण विनातिकीट प्रवास करताना आढळले़ त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)