मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात खास 9 ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:19 AM2018-05-03T11:19:19+5:302018-05-03T11:19:19+5:30

नेहमीच्या ठिकाणांपेक्षा मे महिन्यातील उन्हाच्या झळांपासून दूर जायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत.   

9 best places to visit in may travelling | मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात खास 9 ठिकाणे

मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात खास 9 ठिकाणे

googlenewsNext

उन्हाळा आला की अनेकजण उन्हाच्या झळांपासून थोडा काळ सुटका मिळवण्यासाठी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मे महिन्यात तर सूर्य अक्षरश: आग ओकतो. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. पण अनेकांना नेहमीच्या ठिकाणांवर जाऊन कंटाळा आलेला असतो. अशात नेहमीच्या ठिकाणांना न जाता तुम्हाला मे महिन्यातील उन्हाच्या झळांपासून दूर जायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत.   

1) हार्सिल हिल 

(Image Credit: www.indianholiday.com)

आंध्र प्रदेशातील हार्सिल हिल्सला स्वर्ग मानलं जातं. जर तुम्हाला उंचच उंच डोंगरांचा सुंदर नजारा पहायचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून तुम्हाला इथे शांतता मिळेल. इथे तुम्हाला जागोजागी मोंगे, गुलमोहर आणि यूकेलिप्टसची झाडे बघायला मिळतील. जर तुम्हाला शांत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल. इथे तुम्ही जॉरविंग, रेप्लिंग आणि ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.

2) शिलॉंग

चेरापुंजी मेघालयातील सुंदर पर्वतं बघण्यात एक वेगळीच मजा आहे. शिलॉंग हे एक फार सुंदर शहर म्हणून लोकप्रिय आहे. येथील वेगवेगळे सण, परंपरा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. शिलॉंग ते चेरापुंजी जाताना तुम्हाला अनेक गुहा सुद्धा बघायला मिळतील. चेरापुंजी आशियातील सर्वात स्वच्छ जागांपैकी एक आहे. 

3) मनाली

हिमाचल प्रदेशातील मनाली अशी एक जागा आहे जी तुम्ही आवर्जून बघायला हवी. मे महिन्यात फिरायला जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्या यादीत असायला हवं. कारण ही जागा नेहमी शांतता, थंड आणि सुंदर असते. येथील जंगलं आणि थंट वातावरण या शहराला आणखी सुंदर करतात. 

4) तवांग

तवांग हे शहर अरुणाचल प्रदेशाची शान मानलं जातं. येथील घाट, नद्या आणि तलावं तुम्हाला वेगळ्याच विश्वात असल्याचा आनंद देतील. तुम्हाला इथे उन्हाळ्याच्या अजिबात सोसाव्या लागणार नाहीत. 

5) तीर्थान घाट

(Image Credit: The Better India)

हिमाचल प्रदेशातील निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाहीये. तीर्थान ही जागा हिमालय नॅशनल पार्कपासून 3 किमी अंतरावर आहे. ही जागा ट्राऊट माशांसाठी लोकप्रिय आहे. 

6) कलिम्‍पोंग, दार्जिलिंग

पश्चिम बंगालमधील हे ठिकाण चहाच्या बागा, डोंगर आणि ट्रेनसाठी लोकप्रिय आहे. दार्जिलिंगपासून 58 किमी अंतरावर कलिम्‍पोंग हे शहर आहे. इथे तुम्हाला हवी असलेली शांतता मिळेल. 

7) गंगटोक

गंगटोक हे सिक्कीमची राजधानी आहे. भारतातील अनेक सुंदर शहरांपैकी हे एक शहर आहे. मे महिन्यात तुम्हाला इथे चांगला अनुभव मिळेल. येथील कंचनजंगा हा पर्वत जगातला तिसरा सर्वात मोठा पर्वत आहे. या सुंदर पर्वताच्या सहवासात तुम्हाला वेळ घालवणे नक्कीच आवडेल. 

8) सराहन

हिमाचल प्रदेशातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी सराहन हे एक आहे. हे शहर शिमला जिल्ह्यात येतं. हे शहर सफरचंदाच्या बागांसाठी चांगलंच प्रसिद्ध आहे. तसेच येथील भाबा घाट आणि पक्षी संग्रहालय पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. 

9) मुन्नार, थेक्केडी

केरळमधील मुन्नार हे शहर 6 हजार फूट उंचीवर वसलं आहे. इथे प्रदुषण जराही नाहीये. त्यामुळेच पर्यटक या ठिकाणाला पसंती देतात. हे ठिकाण आपल्या खास संस्कृतीसाठी आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील पेरीयार अभयारण्य जगभरात प्रसिद्ध आहे.

Web Title: 9 best places to visit in may travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास