जलवाहिनी फुटून आठवडा झाल्यानंतर दुरूस्तीस सुरुवात
By admin | Published: September 11, 2015 09:24 PM2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30
ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Next
ठ णे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही भूमिगत जलवाहिनी टेमघरहून आली आहे. ४ सप्टेंबरला ती फुटल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले. परंतु हा परिसर द्रुतगती मार्गावर असल्याने येथे काम करायचे झाल्यास त्याला ठाणे वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या विभागाने त्यांच्याकडे परवानगी मागितली असता हा रस्ता वाहतुकीचा असल्याने ज्या दिवशी कमी वाहतूक असेल त्याच दोन दिवसांत या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घ्या असे त्यांनी सांगितले. त्यानुसार या कामासाठी १२ आणि १३ सप्टेंबर हे दोन दिवस निश्चित करण्यात आले होते. वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, हा रस्ता वर्दळीचा असल्याने आम्ही ज्या दिवशी वाहतूक कमी असेल त्यादिवशी या जलवाहिनीचे काम हाती घ्या असे ठाणे महापालिकेला सांगितले आहे. (प्रतिनिधी) - फोटो आहेत.