परदेशात फिरायला जाणार असाल जाणून घ्या ट्रॅव्हल कार्डचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:23 PM2019-06-25T12:23:35+5:302019-06-25T12:24:43+5:30
परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी किंवा तिथे शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल कार्ड फायदेशीर ठरतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी किंवा तिथे शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल कार्ड फायदेशीर ठरतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्हीही परदेशात फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर याबाबत माहीत असल्यास तुमचा फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊ फायदे....
आजच्या कॅशलेसच्या जमान्यात लोकांसमोर अनेकप्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पैशांची देवाण-घेवाण फारच सोपी झाली आहे. ट्रॅव्हल कार्डही एक अशीच सुविधा आहे. याचा वापर जास्तकरुन परदेश दौऱ्यात केला जातो. सामान्यपणे क्रेडिट कार्ड दोन प्रकारचे असतात, डेबिट आणि क्रेडिट कार्ड. डेबिट कार्डला प्रीपेड मोबाइलप्रमाणे रिचार्ज करून वापरलं जाऊ शकतं. कोणत्याही सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड मध्येही एक क्रेडिट लिमिट असते.
एक्सचेंज शुल्काची माहिती
ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड घेतल्याने आधी करन्सी एक्सचेंजबाबत जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नेहमी अशाच ट्रॅव्हल कार्डची निवड करा, ज्यावर अधिक बोनस मिळतो, जे कमी खर्चाक रिडीम केलं जाऊ शकतं आणि ज्याची वार्षिक फी कमी असते.
कार्डवरच मिळतो वीमा
ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड घेतल्यावर वेगळा ट्रॅव्हल वीमा करण्याची गरज पडत नाही. आजकाल जास्तीत जास्त बॅंक ट्रॅव्हल क्रेडिट कार्डवर वीमा कव्हरेजही मिळतं.
काय असतात सुविधा
ट्रॅव्हल क्रेडिट कार्डमध्ये मल्टीपल करन्सीची सुविधा मिळते. परदेश यात्रेदरम्यान इमरजन्सीमध्ये व्यक्ती क्रेडिट कार्ड लिमिटमध्ये असलेल्या रकमेचा वापर करून एअर तिकीट बुकींग, हॉटेल बुकींग, टॅक्सी बिल आणि शॉपिंगसाठी खर्च करू शकता. तसेच यावर शॉपिंग केल्यास रिवार्ड पॉइंट्सही मिळतात.
प्रायोरिटी समजून घ्या
जर तुम्ही फार कमी प्रवास करणार असाल तर कमी वार्षिक खर्च असलेलं कार्ड खरेदी करा. दुसऱ्या कार्डवर मिळणाऱ्या सुविधांची तुलना करा. ट्रॅव्हल क्रेडिट कार्डची माहिती तुम्ही इंटरनेट किंवा एसएमएसच्या माध्यमातून मिळवू शकता.