एकेकाळी खजिन्यांसाठी ओळखला जायचा कांगडा फोर्ट; आवर्जुन द्या भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 03:15 PM2019-06-11T15:15:25+5:302019-06-11T15:23:32+5:30
तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि फिरण्यासाठी हटके डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत.
तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि फिरण्यासाठी हटके डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत. हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मशाळापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कांगडा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये भारतातील प्राचीन किल्ल्यांपैकी एक असलेला कांगडा फोर्ट स्थित आहे. हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असून तो शिवालिक हिलसाइडजवळ 463 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.
कांगडा फोर्ट उंच-उंच भिंतींनी व्यापलेला आहे. या किल्ल्यांजवळ मांझी आणि बाणगंगा यांसारख्या नद्यांचा संगम आहे. याव्यतिरिक्त तुम्ही धौलाधार येथील सुंदर आणि निसर्गरम्य दृश्यही पाहू शकता.
कांगडा फोर्टबाबत अनेक गोष्टी इतिहासामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. या किल्ल्याचा इतिहास लूट, विश्वासघात आणि विनाश यांसारख्या अनेक गोष्टींबाबत सांगतो. असं सांगण्यात येतं की, हा किल्ला कटोच वंशाचे महाराज सुशर्मा चंद्र यांच्या कारकिर्दीमध्ये उभारला होता. कटोच वंशाबाबत अधिक माहिती प्राचीन त्रिजटा राज्यापासून मिळते. ज्याचा उल्लेख महाभारतामध्ये अहम जनपदच्या रूपामध्ये करण्यात आला होता.
त्रिजटाचे राजा सुशर्मा चंद्र यांनी युद्धामध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. जेव्हा राजा सुशर्मा चंद्र यांनी अर्जुनाचे लक्ष विचलित केलं आणि यादरम्यान द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह तयार केलं आणि त्याने अर्जुनाचा मुलगा अभिमन्युचा वध केला.
कौरवांचा पराभव झाल्यानंतर राजा सुशर्मा चंद्रांच्या वंशजांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून कांगडा शहर विकसित केलं. अनेक वर्षांपूर्वी कांगडा किल्ला मुबलक धन असलेला किल्ला म्हणून ओळखला जात असे. त्यामुळेच या किल्ल्यावर महमूद गजनी, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज शाह तुगलक, अकबर या राजांनी हल्ले केले.
1789मध्ये कटोच वंशाचे राजा संसार चंद द्वितीय यांनी मुघलांकडून आपला प्राचीन किल्ला जिंकला. परंतु 1809मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी किल्ल्यावर कब्जा केला. 1846 पर्यंत हा किल्ला शिखांच्या देखरेखीमध्ये होता. त्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला.
कसे पोहोचाल?
कांगडा किल्ल्यावर पोहोचणं सोपं आहे. धर्मशाला आणि मॅकलॉडगंजपासून थोडसचं अंतर आहे. किल्ल्याच्या पाठिमागे महाराजा संसार चंद कटोच म्युझिअम आहे. जे कटोच कुटुंबियांमार्फत चालवलं जातं. तुम्ही या म्युझिअमलाही भेट देऊ शकता.