सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 01:06 PM2019-06-15T13:06:45+5:302019-06-15T13:10:05+5:30

आतापर्यंत तुम्ही अनेक मोठ्या आणि आकर्षक थीम पार्क्सना भेट दिली असेल. परंतु बेहरीनमध्ये एक अनोखं आणि कल्पनेपलिकडील थीम पार्क तयार करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे खास?  

Bahrain is all set to open worlds biggest underwater theme park | सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

Next

आतापर्यंत तुम्ही अनेक मोठ्या आणि आकर्षक थीम पार्क्सना भेट दिली असेल. परंतु बेहरीनमध्ये एक अनोखं आणि कल्पनेपलिकडील थीम पार्क तयार करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे खास?  तर खरचं हे थीम पार्क अनोखं असणार आहे, कारण हे जगातील सर्वात मोठं पाण्याखाली असलेलं थीम पार्क असणार आहे.

बहरिनमध्ये जगातील सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क तयार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून पार्कच्या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. या पार्कमध्ये बोइंग-747 विमानाचं खास आकर्षण असणार आहे. ऑगस्ट 2019 पर्यंत हे थीम पार्क पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. बहरीन सरकारने यासाठी सर्व तयारी केली असून त्याबाबतचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 

जगातील सर्वात मोठं अंडरवॉटर थीम पार्क तयार करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, पर्यटकांना बेहरिनकडे आकर्षित करणं हाच आहे. फक्त एवढचं नाही तर यामुळे देशातील अर्थव्यवस्थाही वाढवण्यासाठी मदत होईल.

बेहरीनचे व्यापार आणि पर्यटन मंत्री जाएद बिन रशीद अल जायनी यांनी सांगितल्यानुसार, 'जगातील सर्वात मोठ्या थीम पार्कचं प्रोजेक्ट हे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे.' 

रशिद अली यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'हे अंडर वॉटर थीम पार्क पूर्णपणे इको फ्रेंडली असणार आहे. यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे समुद्र आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचणार नाही. हे समुद्र जीवांना सुरक्षित करण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. हे प्रोजेक्ट आंतराष्ट्रिय मापदंडांनुसार तयार करण्यात येत आहे.'

मोत्यांचं घरही पाहता येणार...

पार्कचं मुख्य आकर्षण बोइंग-747 विमान असणार आहे. याआधी कधीही एक मोठ विमान पाण्याच्या आतमध्ये ठेवण्यात आलेलं नाही.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बेहरिनमधील पारंपारिक मोत्यांचं घर पाण्याच्या आतमध्ये पाहता येणार आहे. तसेच एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाण्याचं सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी कोरल रीफ रेप्लिकाही तयार करण्यात आलं आहे. 

Web Title: Bahrain is all set to open worlds biggest underwater theme park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.