शिल्लक-राज्याच्या आरटीओची दयनीय अवस्था
By admin | Published: July 30, 2015 11:14 PM2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
राज्याच्या आरटीओची दयनीय अवस्था
Next
र ज्याच्या आरटीओची दयनीय अवस्थाफक्त २ हजार ८१५ जणांवर आरटीओच्या कामाची धुरापरिवहन आयुक्त कार्यालयातही कर्मचार्यांची वानवा१,२८५ पदे रिक्तसुशांत मोरे- मुंबई - राज्यात परिवहन आयुक्तालयातंर्गत येणार्या आरटीओतील अधिकारी आणि कर्मचार्यांची परिस्थीती सध्या फारच बिकट आहे. वर्षाला साडे पाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसुल देणार्या राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्याअंतर्गत येणार्या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. एवढ्याच अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये राज्याच्या आरटीओचा गाडा हाकत असतानाही त्याकडे कुणाचे लक्ष न जाणे दुदैवच असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.राज्यात आरटीओचा (प्रादेशिक परिवहन अधिकारी) मोठा पसारा आहे. जवळपास ५0 आरटीओ कार्यालय आणि त्याची उप कार्यालये आहेत. यात वाहनांची नोंदणी करणे, लायसन्सचे नुतनीकरण करणे यासह अनेक कामे आरटीओतील अधिकारी तसेच कर्मचार्यांना करावे लागतात. त्याचबरोबर त्यांच्यावर विशेष मोहीमांचीही जबाबदारी दिली जाते. मात्र अपुर्या मनुष्यबळातसुध्दा ही जबाबदारी आरटीओकडून व्यवस्थित पार पाडली जाते. आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत असतानाच परिवहन आयुक्त मुख्यालयातही अवघ्या काही कर्मचार्यांमध्येच कामाचा गाडा हाकत आहेत. याबाबत परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले की,राज्यात आरटीओ आणि परिवहन आयुक्त कार्यालयात सध्या २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत. २00४ साली ४ हजार १00 पदे मंजुर करण्यात आली होती. दहा वर्षापूर्वी एवढी पदे मंजुर करुनही फक्त २ हजार ८१५ जण कार्यरत असल्याने काम करणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास १ हजार २८५ पदे ही रिक्त असून ती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महत्वाची बाब म्हणजे सर्वाधिक मोटार वाहन निरीक्षकाच्या १0९ तर सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाची ३0६ पदे रिक्त आहेत. त्यानंतर लिपिक-टंकलेखकाची २७४, सहाय्यक रोखपालची ६९, कर अन्वेषकची ६0, वाहन चालकाची १७, परिवहन हवालदार ५९, शिपाईंची ४९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. .........................................अ,ब,क आणि ड श्रेणीत एकूण ४ हजार १00 मंजुर पदांपैकी २ हजार ८१५ पदेच भरण्यात आली आहेत. श्रेणीमंजूर पदेभरलेली पदे रिक्तअ७६१६२२ १३९ब४६२२ २४क२,८६६१,९३0 ९३६ड४२७२४१ १८६......................................तसेच रिक्त असलेल्या आणखी काही महत्वाच्या पदांमध्ये प्रादेशिक परिहन अधिकारी एक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ६, मोटार वाहन अभियोक्ता ९, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीची ११ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले. ..........................................महत्वाची बाब म्हणजे शासनाकडून नुकतीच नविन भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठीचा नविन प्रस्ताव शासनाकडे एक महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आला आहे. .................................