इंग्रजी शिकवण्याच्या बदल्यात परदेशात पर्यटनाची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 06:04 PM2017-12-28T18:04:14+5:302017-12-28T18:08:43+5:30

जपान, फ्रान्स, सुदान, व्हिएतनाम, तैवान य देशात आपल्याइतक्या सहजतेनं इंग्रजी बोललं जात नाही. त्यामुळेच इंग्रजी शिकवण्यासाठी या देशांत अनेक कम्युनिटी कार्यक्रमांना आणि व्यक्तींना आमंत्रित केलं जातं.

Be able for teaching English and get a chance of tourism | इंग्रजी शिकवण्याच्या बदल्यात परदेशात पर्यटनाची संधी!

इंग्रजी शिकवण्याच्या बदल्यात परदेशात पर्यटनाची संधी!

googlenewsNext
ठळक मुद्दे* या देशांच्या अशा सफारीत तुम्ही महिन्याला वीस ते चाळीस हजार रूपयेही कमवू शकता.* एरवी आपण पर्यटनाला जातो, तेव्हा तटस्थपणे प्रेक्षणीय स्थळं पाहतो आणि परत येतो. पण जेव्हा तुम्ही अशा काही उपक्र मांच्या माध्यमातून परदेशी जाता तेव्हा तिथल्या सामाजिक जीवनाशी एकरूप होण्याची संधीही मिळते.

 



- अमृता कदम


आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा कसा-कुठे-कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही. शिकलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. उदाहरणार्थ तुम्हाला चांगलं इंग्लिश लिहिता-बोलता येत असेल, या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला चक्क काही देश अगदी फुकटात फिरता येतील. तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये, फक्त तिथल्या लोकांना जाऊन इंग्रजी शिकवायचं आहे. त्या बदल्यात तुम्हाला वेतन तर मिळेलच, पण त्या देशात तुमच्या निवासाची व्यवस्थाही मोफत केली जाईल.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही एकच अट त्यासाठी आहे. जगात अनेक देश असे आहेत, ज्यांना सध्या अशा इंग्रजी शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे ते अशा लोकांना आमंत्रित तर करतातच, पण त्यांच्या राहण्याची मोफत सोयही करतायत. शिवाय ही भाषा शिकवण्यासाठी वेतनही मिळतं.

 

आता एवढं सगळं सांगितल्यावर हे असे देश नेमके कुठले आहेत याबद्दलची तुमची उत्सुकता ताणली असेलच. तर मित्रांनो हे देश आहेत जपान, फ्रान्स, सुदान, व्हिएतनाम, तैवान हे देश. इथे आपल्याइतक्या सहजतेनं इंग्रजी बोललं जात नाही. इंग्रजी व्याकरणामध्ये या देशातील लोक भारतीयांप्रमाणे तरबेज नाहीत. त्यामुळेच इंग्रजी शिकवण्यासाठी या देशांत अनेक कम्युनिटी कार्यक्रमांना आणि व्यक्तींना आमंत्रित केलं जातं. जो कोणी इच्छुक असेल त्यांना फक्त त्या देशात जाण्यासाठीविमान तिकीटाचा खर्च उचलावा लागतो. तिथल्या शाळा, महाविद्यालयात जाऊन इंग्रजी शिकवण्या  बदल्यात राहण्याची, भोजनाची व्यवस्था हे देश अगदी मोफत करतात.
ही बाब इथेच संपत नाही. या देशांच्या अशा सफारीत तुम्ही महिन्याला वीस ते चाळीस हजार रूपयेही कमवू शकता. त्यामुळे अनेकजण पर्यटनासाठी अशा अनोख्या संधीचा वापर करतात.

एरवी आपण पर्यटनाला जातो, तेव्हा तटस्थपणे प्रेक्षणीय स्थळं पाहतो आणि परत येतो. पण जेव्हा तुम्ही अशा काही उपक्र मांच्या माध्यमातून परदेशी जाता तेव्हा तिथल्या सामाजिक जीवनाशी एकरूप होण्याची संधीही तुम्हाला मिळते. जी तुम्हाला खूप काही देऊन जाते.

इंग्रजी शिक्षणाचे अनेक फायदे व्यावसायिक जीवनात पाहायला मिळतात. पण अशा पद्धतीनं आपला छंद, पर्यटनाची आवड जर ही भाषा पूर्ण करणार असेल तर मग तिच्यावर थोडी मेहनत करायला काय हरकत आहे? अनेक होतकरु तरूणांनी हे देश केवळ इंग्रजीच्या बळावर फिरु न घेतले आहेत. तुम्हीही प्रयत्न करु न बघा.

 

Web Title: Be able for teaching English and get a chance of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.