पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:19 PM2018-08-01T16:19:19+5:302018-08-01T16:25:05+5:30
जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं.
जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं. २० हजार लोकसंख्या असलेलं हे तलावावरील गाव आफ्रिकेतील सर्वात मोठं गाव मानलं जातं. जगभरातू हे गाव बघण्यासाठी पर्यटक इथे येत असतात.
(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)
आफ्रिकेचं वेनिस म्हटल्या जाणाऱ्या या गावातील घरापासून ते हॉटेलपर्यंत सगळ्याच गोष्टी पाण्यावर तरंगताना दिसतात. काही दंतकथांनुसार, १६व्या किंवा १७ व्या शतकात आफ्रिकेतील तोफीनु समुदायाच्या लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हे गाव वसवलं होतं.
त्यावेळी फोन नावाची एक जमात या लोकांना गुलाम बनवण्यासाठी येत असत. पण आपल्या काही धार्मिक मान्यतामुळे ते पाण्यात प्रवेश करून कुणालाही बंधक करु शकत नव्हते. त्यामुळे हळूहळू या गावातील लोकांनी या गावातच जीवन शोधलं. आज हे संपूर्ण गाव एकत्र राहतं.
(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)
या गावातील घरे आणि हॉटेल्स सगळंच पाण्यात आहे. इतकेच नाही तर येथील पोस्ट ऑफिस, बॅंक, हॉस्पिटल, चर्च आणि शाळाही पाण्यावर तरंगतात. ही जमिनही या गावातील लोकांनी मिळून तयार केली आहे. १९९६ मध्ये या गावाला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज यादीत सामिल केलं आहे.
(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)
इथे येणाऱ्या पर्यटकांना वेनिसप्रमाणे आलिशान बोट नाही मिळत पण गाव बघण्यासाठी भाड्याने होडी नक्कीच मिळते. इथे राहणाऱ्या लोकांची संस्कृती आफ्रिकेतील इतर लोकांच्या तुलनेत फार वेगळी आहे. त्यामुळे येथील संस्कृती पाहण्यासाठीही काही लोक इथे येतात.