स्वर्गाहूनी सुंदर... चंद्र-सुर्याप्रमाणे दिसतो 'हा' तलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:35 PM2019-02-08T17:35:30+5:302019-02-08T17:40:03+5:30
जगभरामध्ये अनेक सुंदर तलाव, डोंगर, झरे, धबधबे आहेत. या सर्व ठिकाणांची आपली अशी वेगळी वैशिष्ट्य आहेत. अशा ठिकाणांना निसर्गाची अद्भूत किमया म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
जगभरामध्ये अनेक सुंदर तलाव, डोंगर, झरे, धबधबे आहेत. या सर्व ठिकाणांची आपली अशी वेगळी वैशिष्ट्य आहेत. अशा ठिकाणांना निसर्गाची अद्भूत किमया म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यापैकीच ही काही ठिकाणं आहेत. तुम्ही जर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अशा काही ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. तुम्ही जर काहीतरी हटके आणि निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल. तर या ठिकाणी नक्की जा.
आम्ही तुम्हाला एका तलावाबाबत सांगणार आहोत. हा तलाव एवढा सुंदर आहे की, जिथे जाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल की,या तलावामध्ये असं काय खास आहे? जगभरामध्ये अनेक असे तलाव आहेत जे आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासाठी ओळखले जातात. पण हा तलाव या सर्वांपेक्षा वेगळा आहे. का वेगळा आहे, जाणून घेऊया...
आम्ही आज तायवानच्या एका अनोख्या तलावाबाबत सांगणार आहोत. ज्या तलावाचा आकार वेळोवेळी बदलत असतो. आहे की नाही हटके गोष्ट. तायवानमध्ये असलेल्या या तलावाचे नाव 'सनमून लेक' असं आहे. कोणत्याही दिशेनं पाहिलं तर याचा आकार प्रत्येकवेळी वेगळाच दिसतो.
जर तुम्ही या तलावाला पूर्व दिशेने पाहिले तर सुर्याप्रमाणे गोल आकारामध्ये दिसून येतो. याऐवजी जर तुम्ही याला पश्चिम दिशेने पाहिले तर तुम्हाला हा तलाव चंद्राप्रमाणे दिसतो.
'सनमून लेक'च्या चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. प्रत्येकवेळी बदलणारा आकार आणि एकाच वेळी चंद्रसूर्याप्रमाणे दिसत असल्यामुळे या तलावाला 'सनमून लेक' असं नाव देण्यात आलं आहे.
तायवानमध्ये असलेला हा तलाव सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर आहे. ज्याच्या चारही बाजूंना फक्त डोंगरांगाच दिसतात. ज्याला पाहून नेहमी लोक विचारात पडतात की, आपण स्वर्गच तर पाहात नाही ना? अनेक पर्यटक फक्त हा तलाव पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात.