हनिमूनला गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर 'असं' करा प्लॅनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 06:10 PM2020-01-27T18:10:36+5:302020-01-27T18:12:35+5:30
सध्या लग्नाचा सिजन सुरू झाला आहे.
सध्या लग्नाचा सिजन सुरू झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या पार्टनर सोबत कुठे जाण्याचा विचार असाल तर तुम्ही एका छानश्या हनिमून डेस्टिनेशनला जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका हनिमून डेस्टिनेशनबद्द्ल सांगणार आहोत. भारतात हनिमून डेस्टिनेशन म्हटलं की गोवा या ठिकाणाला पसंती दिली जाते. आज आम्ही तुम्हाला गोव्याला गेल्यानंतर कोणत्या ठिकाणांना भेट देता येईल हे सांगणार आहोत. गोव्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या कपल्स इन्जॉय करू शकतात.
(image credit- lonely planet)
हनीमूनला जाण्यासाठी सगळ्यात चांगली जागा
फेब्रुवारी मध्ये जर तुम्ही हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल तर गोवा तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत या ठिकाणी अंडर वॉटर एक्टीव्हीटीमध्ये सहभाग घेऊ शकता. एखाद्या शांत ठिकाणी बीचवर तुम्हाला वेळ घालवता येईल. रोमॅन्टींक टूरसाठी दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा हे दोन कमालीचे ठिकाणं आहेत. जे तुमच्या हनिमूनला अविस्मरणीय बनवू शकतात. या ठिकाणची नाईट लाईफ आणि बीच तुमच्यासाठी आनंदायी ठरतील. तसंच बोटींगचा आनंदसुद्धा तुम्ही घेऊ शकता. गोव्यात कपल्सना जाण्यासाठी सगळ्यात जास्त रोमॅन्टीक ठिकाणांमधले एक म्हणजे बटरफ्लाय बीच. दोन पर्वतांच्या मधोमध हा बीच आहे. गोव्यातील सगळ्यात प्रसिध्द बीचपैकी ही बीच आहे. हा बीच सुंदर आणि परदेशी फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखला जातो.
किती दिवसांची ट्रिप कराल
जर तुम्ही गोवा फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चार दिवसात पुर्ण मजा घेता येईल. एका दिवसात तुम्ही गोव्याचे बीच पाहण्याचा तसंच शॉपिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. तसचं आराम करण्यासाठी तुम्हाला एक दिवस पुरेसा आहे. जर तुमच्याकडे अधिकवेळ असेल तर तुम्ही उत्तर गोव्यासाठी २ दिवस मग दक्षिण गोव्यासाठी २ दिवस तसंच खरेदी करण्यासाठी एक दिवस मग आराम करण्यासाठी एक दिवस असं इन्जॉय करू शकता. ( हे पण वाचा-यादगार हनिमूनसाठी बेस्ट ठरू शकेल 'हे' डेस्टिनेशन, पुन्हा पुन्हा जायची होईल इच्छा)
गोवा फिरण्यासाठी किती खर्च येईल
(image credit- easemytrip)
गोव्याला फिरायला जाण्यासाठी किती खर्च करायचा कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे पण तुम्हाला मुंबई ते गोवा नंतर त्याठिकाणी फिरण्याचा खर्च मिळून १० ते १२ हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. जर तुम्हाला काही शॉपिगं करायचं असेल तर त्याचा वेगळा खर्च येतो. ( हे पण वाचा-समुद्र सफरीचा आनंद घेतील महाराष्ट्रातील पर्यटक, सिंधुदुर्गात सुरू होणार टुरीस्ट सबमरीन सेवा)