कोलकत्याजवळील 'या' ऑफबीट ठिकाणांना भेट देऊन घ्या निसर्गाचा अविस्मरणीय आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:12 PM2020-02-06T15:12:34+5:302020-02-06T15:19:21+5:30

काही पर्यटन स्थळ अशी असतात जी फारशी  प्रसिध्द नसतात.

Best place to travel offbeat places in kolkata | कोलकत्याजवळील 'या' ऑफबीट ठिकाणांना भेट देऊन घ्या निसर्गाचा अविस्मरणीय आनंद!

कोलकत्याजवळील 'या' ऑफबीट ठिकाणांना भेट देऊन घ्या निसर्गाचा अविस्मरणीय आनंद!

Next

काही पर्यटन स्थळ अशी असतात जी फारशी  प्रसिध्द नसतात. पण  त्या ठिकाणी फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते.  कोलकाता भारतातील एक सुंदर ठिकाणं असून भारतातील अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात तुम्ही असाल तर कोलकाता या शहारापासून काही अंतरावर असलेल्या या ठिकाणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  आपण अनेकदा एखाद्या शहराला भेट देतो. पण ज्या ठिकाणी जायला हवं त्या ठिकाणी जायचं राहून जातं. जर तुम्हाला प्राण्याची सफर करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 

सॅमसिंग

सॅमसिंग हे पश्चिम बंगालच्या जलपागुडी जिल्ह्यात एक लहानसे गाव आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी  कोलकतावरून ६६४ किमी चा प्रवास करावा लागेल. या ठिकाणी चहाच्या बागा आणि पर्वत तसचं जंगलं सुद्धा आहेत. या जंगलामध्ये आणि चहाच्या बागांमध्ये फिरताना तुम्हाला  अनोखा अनुभव येईल. या ठिकाणाला मारूती नदी द्वार मानले जाते. सॅमसिंगपासून ५ किलोमीटर अंतरावर रॉकी आयलॅंड आहेत. कंजनजंघा नॅशलन पार्क आहे. (हे पण वाचा-पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट)

दुआर्स

कोलकतापासून ६३२ किलमीटर अंतरावर दुआर्स हे स्थळ आहे. ज्या लोकांना कमी गर्दीच्या ठिकाणी आणि कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी जायचं असेल तर हे ठिकाण वीकेंडचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट आहे. उत्तरेला हिमालय हा दूर दूर पर्यंत पोहोचला आहे.  याठिकाणी तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाऊ शकता. जलदापाड़ा वन्यजीव अभ्यारण्यात एक शिंग असणारे दरियाई घोडे तुम्हाला पाहता येतील.  गोरुमारा नॅशनल पार्कमध्ये तुम्ही प्राण्याच्या सफारीचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तीस्ता नदी आहे. त्याठिकाणी तुम्ही वॉटर राफ्टिंगचासुद्धा करू शकता.  या ठिकाणी तुम्हाला खूप हत्ती पाहायला मिळतील इतकेच नाही तर हत्तीवर बसून तुम्ही फिरू सुद्धा शकता. ( हे पण वाचा-बर्फाळलेल्या प्रदेशात पाण्यावर तरंगणारे हॉटेल; भाडे सोडा, नजारे पाहूनच म्हणाल अद्भूत)

Web Title: Best place to travel offbeat places in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.