हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स, पैसा वसूल ट्रीपचा घ्या आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:56 PM2023-11-08T15:56:52+5:302023-11-08T16:11:50+5:30
Winter Travel Tips : काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही थंडीचा आनंद घेऊ शकाल.
Winter Travel Tips : देशात सध्या सगळीकडे थंडी लाट पसरली आहे. भारतात तर या दिवसात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण त्यातल्या त्यात काही खास अशी ठिकाणे आहेत जिथे तुमची सुट्टी तुम्ही अधिक जास्त एन्जॉय करु शकता. अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही थंडीचा आनंद घेऊ शकाल.
गोकर्णा
कर्नाटकातील गोकर्णा हे ठिकाण देशातील वेगवेगळ्या लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. ही जागा शांततेसाठी आणि एकट्याने वेळ घालवण्यासाठी चांगलीच लोकप्रिय आहे. या ठिकाणाची खासियत म्हणजे गोव्याच्या तुलनेत इथे कमी गर्दी असते. थंडीच्या दिवसात सुमद्र किनारी तुम्ही इथे फार चांगला वेळ घालवू शकता. या दिवसात येथील वातावरण फारच चांगलं राहतं.
मांडवी
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी हे एक ऐतिहासिक शहर असून इथे कच्छ राजवंशातील राजा वेळ घालवण्यासाठी येत असत. आधी हे ठिकाण किल्लेबंद भींतीच्या आत होतं. पण आता ती भींत नष्ट झाली आहे. याच शहरात ४० वर्ष जुनं जहाजं तयार करण्याची इंडस्ट्रीही आहे. इथेही तुम्ही थंडीची सुट्टी चांगली एन्जॉय करु शकता.
जेसलमेर
राजस्थानमधील जेसलमेर या शहराला गोल्डन सिटी या नावानेही ओळखलं जातं. कारण येथील थार वाळवंटातील रेती सोनेरी रंगासारखी सगळीकडे पसरली आहे. या शहरात अनेक तलाव, भव्य जैन मंदिर, राजवाडे आणि पिवळे दगडापासून तयार किल्ले आहेत. या शहरातील जास्तीत जास्त ठिकाणांना ऐतिहासिक महत्त्व आहे आणि येथील वातावरणी फार वेगळं आहे. येथील वाळवंटात उंटाची सवारी करण्याची एक वेगळीच मजा आहे.
पुद्दुचेरी
पुद्दुचेरीला पॉन्डी असेही म्हटले जाते. पुद्दुचेरी हे शहर पूर्वी फ्रेन्च कॉलनी होती. त्यामुळे आजही येथील संस्कृतीमध्ये फ्रेन्च संस्कृतीचा प्रभाव बघायला मिळतो. हे शहर केवळ बीच किंवा वेगवेगळ्या सुंदर स्थळांसाठीच नाही तर ओरोविल्ले येथील ऑरोबिंदो आश्रमासाठीही प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात फिरण्यासाठी हे एक चांगलं डेस्टिनेशन म्हणता येईल.
वर्कला
तिरुवनंतपुरममध्ये स्थित वर्कला एक फार सुंदर ठिकाण आहे. वर्कला हे केरळ राज्यातील एकमेव पर्वतीय क्षेत्र आहे. जे समुद्र किनारी आहे. येथील सुंदरता पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातील पर्यटक येतात. येथे समुद्र किनाऱ्यासोबतच २ हजार वर्ष जुनं विष्णू मंदिर आणि सिवाबिरी मठही आहे. हे सुद्धा समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरच आहे.