सारखं त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळलात? हिवाळ्याचा दुप्पट आनंद देईल 'हे' ठिकाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:12 PM2019-12-09T12:12:08+5:302019-12-09T12:15:10+5:30
हिवाळा सुरू झाला आहे .तसंच नाताळ आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे राहीले आहेत.
हिवाळा सुरू झाला आहे .तसंच नाताळ आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे राहीले आहेत. तर घरी राहून बोअर होण्यापेक्षा आजचं प्लान बनवा. नेहमी त्याच त्याच ठिकाणी फिरायला जाऊन कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्याठिकाणी तुम्ही या आधी कधीही गेला नसाल, आणि जिथे गेल्यानंतर तुम्हाला थंडीचा दुप्पट आनंद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणतं आहे ते ठिकाण.
गंगटोक हे पर्यटन स्थळ भारतातील सिक्कीम राज्यात आहे. गंगटोक भारतातील सर्वात स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात. शिवाय इथली पर्यटनस्थळं आणि व्यवस्थाही खूपच चांगली आहे. इथे सर्वात महत्त्वाचं बघण्याचं ठिकाण म्हणजे नथू-ला. त्यासाठी तुम्हाला परमीट घ्यावं लागतं, जे गंगटोकला मिळतं. इथे मध्ये लागणारा छांगू लेक हा अतिशय नयनरम्य आहे. शिवाय इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही त्यामुळे तुम्हाला तिथे प्रसन्न वाटतं. गंगटोकमध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर तुम्हाला हिमालयाच्या रांगा दिसतात.
हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं अत्यंत सुंदर आणि शांत राज्य म्हणजे सिक्किम. सिक्कीम जितकं शांत आहे तितकंच ते नयनरम्य आहे. सिक्किममधील निसर्ग हा अतिशय मनमोहक आहे. त्यामुळे मोठ्या सुट्टीमध्ये सिक्कीमला जाणं हा खूपच चांगला पर्याय आहे. या ठिकाणी नेपाळी, भूतिया आणि लेपचा या जमातीचे लोकमोठ्या संख्येने राहतात. सिक्कीमचे रस्ते हे डोंगरदऱ्यातून जाणारे असल्यामुळे अरूंद आहेत. चीनच्या सीमेला हे लागून असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सैन्याची लोकं असतात.
मुंबईवरून रेल्वेने कोलकाता मग तिथून जलपाईगुडी आणि मग गंगटोक असा एक पर्याय आहे. पण हा प्रवास खूपच मोठा आहे. .तसंच तुम्ही विमानाने सरळ गंगटोकजवळील बागडोगरामध्ये उतरा. आणि मग तिथून गंगटोकला जाऊ शकता. सिक्कीमची ही राजधानी साधारणतपणो ५ हजार चारशे १0 फूट उंचीवर आहे. गंगटोकला तुम्हाला सुमो अथवा जीप असा पर्याय निवडून सिक्कीम फिरता येतं. या ठिकाणी बसची सोय नाही.