गोव्यातील यूनिक पार्टी क्लब आणि जंगलात लपलेले खास समुद्र किनारे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:19 PM2018-12-25T16:19:31+5:302018-12-25T16:22:19+5:30
गोवा हे एक असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जिथे लोक जास्त पार्टी किंवा न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी येणं पसंत करतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे येतात.
गोवा हे एक असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जिथे लोक जास्त पार्टी किंवा न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी येणं पसंत करतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे येतात. पण अजूनही अशी अनेक ठिकाणे किंवा बीचेस आहेत जे लोकांना माहितीच नाहीत. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जंगलांमध्ये हरवले गेलेले बीच फार सुंदर आणि आनंद देणारे आहेत. त्यामुळे तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नेहमीच्या लोकप्रिय बीचऐवजी या बीचेसवर मजा करा. तसेच काही खास पार्टी प्लेसही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जंगलात दडलेले आणि न पाहिलेले बीच
मीरामार
पणजीजवळ केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या या सुंदर बीचवर मुलायम वाळू, ताडाची झाडे आणि अरबी समुद्राची निळी चादर तुमच्यावर मोहिनी घातल्याशिवाय राहणार नाही. या बीचच्या सुंदरतेमुळे या बीचला गोल्डन बीच म्हटलं जातं.
मोबोर
(Image Credit : TripAdvisor)
काहीतरी रोमांचक किंवा काहीतरी थरारक करणाऱ्या पर्यटकांसाठी मोबोर बीच सर्वात बेस्ट पर्याय आहे. दाट जंगलात असलेल्या या बीचवर पर्यटक वेगवेगळे अॅडवेंचर स्पोर्टचा आनंद घेऊ शकतात. यात वॉटर स्कीईंग, वॉटर सर्फिंग, जेट स्की, बनाना-बम्प राइड आणि पॅरासिलींगचा समावेश आहे.
वागातोर
(Image Credit : YouTube)
हा बीच म्हापसा रोडवर पणजीपासून २२ किमी अंतरावर आहे. येथील पांढरी वाळू, काळे दगडी डोंगर, नारळ आणि खजूराची झाडे वेगळाच अनुभव देतात. इथे ५०० वर्ष जुना पोर्तुगाल किल्लाही आहे. या बीचला बिग आणि लिटिल वागातोर नावानेही ओळखला जातो.
मोरजिम
हा बीच टर्टल बीच नावानेही ओळखला जातो. हा बीच नॉर्थ गोव्यात परनेममध्ये आहे. इथे कासवांची दुर्मिळ होत असलेली प्रजाती ओलिव रिडलेच्या राहण्याची जागा आणि प्रजनन जागा आहे.
बेटलबटीम
मजोरडा बीचच्या दक्षिणेला असलेला हा गोव्यातील सर्वात सुंदर बीचपैकी एक आहे. शानदार सूर्यास्तमुळे या बीचला सनसेट बीच ऑफ गोवा असेही म्हटले जाते. हा बीच फार शांत आहे.
खास पार्टी प्लेसेस
एलपीके वॉटरफ्रन्ट
या ठिकाणाला लव, पॅशन आणि कर्मा नावानेही ओळखलं जातं. हे ठिकाण केंडोलियमध्ये नेरुळ नदीच्या किनारी आहे. हे ठिकाण खासकरुन ख्रिसमस आणि न्यू इअर पार्टीसाठी ओळखलं जातं. इथे रात्रभर पार्टी सुरु असते.
सिन-क्यू बीच क्लब
हा क्लब एलपीके वॉटरफ्रन्टच्या फार जवळ आहे. इथे इंडियन आणि इंटरनॅशनल डिजे असतात. क्लबमध्ये एलइडी डान्सिंग आणि फायर डांन्सिग फार प्रसिद्ध आहे.
हिलटॉप
हे गोव्यातील सर्वात जास्त लोकप्रिय पार्टी डेस्टिनेशन आहे. गोव्यातील सुंदर ठिकाणी झाडांच्या मधोमध म्यूझिकवर थिरकण्यासाठी लोक इथे गर्दी करतात. फ्लोरेसेंट रिबन आणि भींतींवर अनेकप्रकारच्या सुंदर रंगांचा वापर करण्यात आला आहे.
कर्लीज
हे गोव्यातील उत्तर भागात अंजुमा बीचसमोर स्थित आहे. लाइव म्युझिक, कॉकटेल्स आणि गोव्यातील सी फूड येथील खासियत आहे. हे ठिकाण मार्केटपासूनही फार जवळ आहे.
क्लब कुबाना
(Image Credit : TripAdvisor)
हा क्लब अंजुमा बीचजवळ अपोरा हिल्सवर आहे. इथे पूल, प्रायवेट लाउंज, फंकी डान्स फ्लोर आणि वेगवेगळ्या म्युझिक सुविधा आहेत.