गोव्याच्या गर्दीला कंटाळले असाल तर आता सुंदर गोकर्णच्या बीचवर नक्की फिरून या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:31 PM2020-02-22T16:31:15+5:302020-02-22T16:57:58+5:30
गोकर्ण या ठिकाणी तुम्ही मावळत्या सुर्याचा अनोखा नजारा पाहण्याता आनंद घेऊ शकता. सी फुडसाठी या बीचचा परिसर प्रसिद्ध आहे.
(image credit- hello travel)
गोव्याला आपण अनेकदा फिरायला जातो. पण गर्दीचा त्रास आपल्याला करावा लागतो. शांत वातावरण वाटत नाही. कारण सगळयांनाच गोव्याच्या सौंदर्याची आणि बीच पाहण्याची खूप उत्सुकता असते. तुम्ही सुद्धा सुट्टी इन्जॉय करण्यासाठी बीचवर जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हला एका खास ठिकाणाबदद्ल सांगणार आहोत. जर तु्म्हाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून कुठे जायचं असेल तर गोकर्ण या शांत ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता.
(image credit- holidify)
गोकर्ण हे ठिकाण आधी धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं होतं. पण सध्याच्या काळात हे ठिकाण इतकं प्रसिध्द झालं आहे की या ठिकाणचे सुंदर बीच याची ओळख बनले आहेत. याच कारणामुळे या ठिकाणच्या भक्तांसोबतच प्रवासी आणि सुट्टी इन्जॉय कराययला येत असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे.
(image credit- travel triangle)
खुप शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेला हा बीच आहे. गोव्याच्या तुलनेत या ठिकाणी तुम्हाला खूप शांतता जाणवेल. या ठिकाणी कुड्ले, ओम, हाफ मून आणि पॅराडाइव हे बीच आहेत. गोकर्णला तुम्ही मावळत्या सुर्याचा अनोखा नजारा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. सी फुडसाठी या बीचचा परिसर प्रसिद्ध आहे. ( हे पण वाचा-डेन्मार्कमधील सर्वात सुंदर बेट; पण दरवर्षी रक्ताने लाल होतो येथील...)
(image credit- holiday)
गोकर्ण आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त अद्भूत अनुभव ट्रेकिंगचा येईल. ज्यांना पर्वतांवर फिरण्याची आणि समुद्राची आवड आहे असे लोक या ठिकाणी मनसोक्त मजा करू शकतात. गोकर्णमध्ये समुद्रकिनारी केल्या जात असलेल्या योगाचे खूप महत्व आहे. आत्मिक शांतीच्या शोधात या ठिकाणच्या लोक कुड्ले बीचवर जाऊ शकतात. या ठिकाणचे बरेचसे प्रशिक्षक तुम्हाला गाईड करण्यासाठी असतील. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मावळत्या सुर्याच्या सानिध्यात योगा करण्यासह तुम्ही स्वतःचं मन शांत करू शकता. ( हे पण वाचा- भारतीय सैनिकाचं 'असं' मंदिर जिथे चिनी सैनिक सुद्धा करतात वंदन)