पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 04:56 PM2020-02-05T16:56:42+5:302020-02-05T17:00:25+5:30
फिरायला जाण्यासाठी जवळच्या जवळ असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल.
फिरायला जाण्यासाठी जवळच्या जवळ असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही निसर्गसौदर्याचा आनंद घेऊ शकता. गोव्याच्या बीचवर तुम्ही जसं इन्जॉय करता. त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही महाराष्ट्रातील या ठिकाणी घेऊ शकता.
वेळणेश्वर या समुद्रकाठच्या पर्यटनस्थळात सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळांमध्ये वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळणावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण २२ कि.मी. अंतरावर गाव आहे. सुमारे १२०० वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.
वेळनेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरीहून सुमारे १७० किमी दूर स्थित एक पर्यटनस्थळ आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले. मंदिर आणि समुद्र तट असलेले हे गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. येथील तट नारळाच्या झाडांनी भरलेले आहे. या ठिकणी जाऊन तुम्हाला खूप आनंद होईल कारण जवळच्याजवळ तुम्हाला या ठिकाणी बीजवर एन्जॉय करता येईल.
हा बीच बराच मोठा असून कमी गर्दी असल्यामुळे येथे अगदी शांत आणि आनंददायी वातावरण असतं. तटाजवळ महादेवाचे जुने मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १७०० वर्षांपूर्वीचे आहे. स्विमिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही बोटींगचाही आनंद घेऊ शकता.
( हे पण वाचा-भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट)
या ठिकाणी कसं पोहोचाल
पुण्याहून ३०६ किमी अंतरावर आहे. मुंबईव्यतिरिक्त सर्व मोठ्या शहरांपासून बस व टॅक्सी घेऊन येथे पोहचू शकता. या पर्यटनस्थळापासून जवळचे रेल्वे स्थानक चिपळूण आहे. जे वेळनेश्वरहून ६० किमी अंतरावर आहे. वेळणेश्वर येथील निसर्ग अगदी मनाला प्रसन्न करणारा आहे. इथे येणार्या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स वगैरे आहेत. तसेच वेळणेश्वर भक्त निवसाताही उत्तम सोय होऊ शकते. ( हे पण वाचा-व्हॅलेनटाईन डे ला पार्टनरला बाहेर घेऊन जायचंय? वन डे रिटर्न ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट!)