राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर झाली सर्वात जास्त आक्रमणे, १७०० वर्ष जुना आहे हा किल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:41 AM2019-03-13T11:41:53+5:302019-03-13T11:51:15+5:30
राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात.
(Image Credit : TripAdvisor)
राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात. यातीलच एक किल्ला म्हणजे राजस्थानच्या हनुमानगडमधील भाटनेर किल्ला. हा किल्ला फार जुना आणि शानदार आहे. हा किल्ला भारतातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे.
या किल्ल्याच्या चारही बाजूने मरूस्थलने वेढलेला हा किल्ला राजस्थानच्या उत्तर सीमेकडे आहे. १८०५ मध्ये बिकानेरचे राजा सूरत सिंह यांनी हा किल्ला भाटियांकडून जिंकला होता. मंगळवारच्या दिवशी मिळवलेल्या या विजयाला हनुमानासोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणाचं नाव हनुमानगड ठेवलं गेलं. भटनेर किल्ल्याची बनावट आणि मजबूती अशी होती की, याचा उल्लेख स्वत: तैमूर लंग ने त्याच्या पुस्तकात केला होता.
किल्ल्याची बनावट
या किल्ल्याचं निर्माण २८५ मध्ये भाटी राजा भूपत यांनी केलं होतं. किल्ला पक्क्या वीटा आणि चुन्याच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. यात ५२ बुर्ज आहेत. दरबारापर्यंत घोड्यावरून जाण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच किल्ल्याच्या आत हनुमानाचं मंदिर आणि शिवाचे काही मंदिरे आहेत. सोबत शेर शाह सूरीची समाधी सुद्धा आहे.
(Image Credit : MouthShut.com)
किल्ल्याची खासियत
राजस्थानच्या या किल्ल्यावर अकबरपासून ते पृथ्वीराज चौहाना यांनी शासन केलं. हनुमानगडचा हा किल्ला साधारण १७०० वर्ष जुना आहे. याच किल्ल्यावर सर्वात जास्त आक्रमणे झाली होती. परदेशी आक्रमणांचं सांगायचं तर महमूद गजनवी ने १००१ मध्ये भटनेर किल्ल्यावर ताबा मिळवला होता. १३व्या शतकात गुलाम वंशाचे शासक बलबनचा चुलत भाऊ शेर खां ने इथे राज्य केलं. आणि १३९८ मध्ये तैमूर लंगने हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर तैमूर म्हणाला होता की, यापेक्षा सुरक्षित किल्ला हिंदुस्थानात दुसरा नाही.