अहमदनगरमधील ५०० वर्षाचा इतिहास असलेला 'हा' किल्ला पाहिला का? नसेल तर लगेच करा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:52 PM2020-02-18T14:52:38+5:302020-02-18T15:03:27+5:30

अभेद्य मानला जाणारा अहमदनगरचा किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता.

Bhoikoat killa in ahamadnagar is best turist place in maharashtra | अहमदनगरमधील ५०० वर्षाचा इतिहास असलेला 'हा' किल्ला पाहिला का? नसेल तर लगेच करा प्लॅन!

अहमदनगरमधील ५०० वर्षाचा इतिहास असलेला 'हा' किल्ला पाहिला का? नसेल तर लगेच करा प्लॅन!

Next

फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्राबाहेरची ठिकाणं कशाला जवळच्याजवळ जाऊन सुद्धा तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासीक किल्ले आहेत .यापैकी सगळेच तुम्हाला माहीत असतील असं नाही. आज आम्ही तुम्हाला अहमदनगरच्या ऐतिहासीक वास्तुंबद्दल सांगणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. 

अहमदनगर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या ठिकाणचा भुईकोट किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. अहमदनगरमध्ये निझामशाही काळातील अनेक इमारती या ठिकाणी आहेत.

अभेद्य मानला जाणारा अहमदनगरचा भुईकोट किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता.

तेथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. या किल्ल्याला  ५०० वर्षांचा इतिहास असून  निजामशाहीचा संस्थापक अहमद  बादशाहाने शहर  वसविण्यापूर्वी इ.स. १४९० मध्ये किल्ला बांधला.

अहमदनगर किल्ल्याजवळ साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोपीयन लोकांची आणि इतर लोकांची कबरे आहेत. शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे. ( हे पण वाचा-भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!)

ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे 20 फूट रूंद आहे. या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे. ( हे पण वाचा-Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन)

Web Title: Bhoikoat killa in ahamadnagar is best turist place in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.