पक्षी प्रेमी असा अथवा नसा पण या दहा पक्षी अभयारण्यापैकी कुठेही जावून आलात तरी तुम्ही पक्षीवेडे व्हाल हे नक्की!
By admin | Published: June 13, 2017 06:21 PM2017-06-13T18:21:16+5:302017-06-13T18:27:14+5:30
पक्षीसृष्टीची जादू अनुभवायची असेल, त्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल तर तुम्हाला पक्षीअभयरण्यांना भेट देण्याशिवाय पर्याय नाही.
- अमृता कदम
आपल्या शहरी आयुष्यातून चिमण्या, पोपट, बुलबुल, साळुंख्या असे नेहमी दिसणारे पक्षी आता गायबच होत चालले आहेत. नाहीसे होणारे अधिवास, प्रदूषण, आपली स्वत:च्या पलिकडे न पाहण्याची वृत्ती अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. त्यामुळेच पक्षीसृष्टीची जादू अनुभवायची असेल, त्यांचा किलबिलाट ऐकायचा असेल तर तुम्हाला पक्षीअभयरण्यांना भेट देण्याशिवाय पर्याय नाही. भारतात हिमालयाच्या कुशीपासून दक्षिणेतल्या सदाहरित जंगलांपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपासून ते पूर्वेला अरूणाचल प्रदेशपर्यंत अनेक पक्षीअभयारण्यं आहेत, जिथे तुम्हाला पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती पहायला मिळतात.
1. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क( उत्तराखंड)
देशातल्या या सर्वांत जुन्या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला पक्षांच्या दुर्मिळ प्रजाती पहायला मिळतात. पक्षी निरिक्षणासाठी सोलुना रिसॉर्ट आणि कलगढ बांध सारख्या खास जागाही आहेत. मैहपाई-रोबिन, बुलबुल असे पक्षीही ठराविक काळासाठी इथे स्थलांतर करु न येतात.
2. भरतपूर पक्षी अभयारण्य (राजस्थान)
भरतपूरमधलं केवलादेव घाना राष्ट्रीय पक्षी उद्यान हे देशातलं सर्वांत मोठं पक्षी अभयारण्य आहे. इथे येणाऱ्या स्थलांतरित पक्षांच्या अनेक प्रजातींमुळे हे अभयारण्य विदेशी पर्यटकांच्या तसंच अभ्यासकांच्याही आकर्षणाचा भाग आहे. क्रेन , पेलिकन, गरूडाच्या वेगवेगळ्या जाती तुम्हाला पहायला मिळतात.
निसर्गसौंदर्याचा आनंद आणि सान्निध्य अनुभवायचं असेल तर तुम्ही कधीही या अभयारण्यांना भेट देऊ शकता. मात्र जर स्थलांतरित पक्षांच्या वेगवेगळ्या जाती मोठ्या संख्येनं पाहायच्या असतील तर या अभयारण्यांना भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे आॅक्टोबर ते मार्च! तुम्ही अगदी हौशी पक्षीनिरीक्षक नसला तरी वेगवेगळे पक्षी पाहण्याचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी यातल्या एखाद्या अभयारण्याला नक्कीच भेट द्यायला हवी.