सहा पर्यटकांनी केली अंतराळाची सफर, ब्लु ओरिजनचं २०२२ वर्षातलं पहिलं अंतराळ मिशन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:20 PM2022-04-04T17:20:19+5:302022-04-04T17:24:01+5:30
त्यात हे यान करमन रेषा ओलांडून पृथ्वीच्या १०० किमीच्या वर गेले तेव्हा प्रवाशांना काही वेळ शून्य गुरुत्वाकर्षण आणि वजनरहित अवस्थेचा अनुभव घेता आला.
जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनने गुरुवारी २०२२ मधले पहिले अंतराळ मिशन लाँच केले. यात सहभागी झालेल्या सहा पैकी सहा पर्यटकांनी न्यू शेफर्ड मधून पृथ्वीची कक्षा ओलांडून जाण्यासाठी एक सीट मिळावी यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले. केवळ १० मिनिटांचा हा प्रवास होता. त्यात हे यान करमन रेषा ओलांडून पृथ्वीच्या १०० किमीच्या वर गेले तेव्हा प्रवाशांना काही वेळ शून्य गुरुत्वाकर्षण आणि वजनरहित अवस्थेचा अनुभव घेता आला.
हे यान ध्वनीच्या तिप्पट वेगाने गेले तेव्हा तीन मिनिटानंतर न्यू शेफर्ड पासून बुस्टर वेगळा झाला आणि प्रवाशांना वजनरहित अवस्थेचा अनुभव मिळाला. या काळात हे प्रवासी त्यांच्या सीट मधून बाहेर पडले होते. चार मिनिटांनी न्यू शेफर्डने अंतराळात प्रवेश करून करमन रेषा पार केली. ही रेषा पृथ्वी आणि अंतराळ यांच्या सीमेवरची काल्पनिक रेषा आहे. याचवेळी बुस्टर पृथ्वीवर परतले होते तर अंतराळ प्रवाशांचा प्रवास पृथ्वीकडे सुरु झाला होता. हे यान वाळवंटात सुरक्षित उतरले. न्यू शेफर्ड अंतराळ यानाचे हे चौथे मिशन होते तर नवीन वर्षातील पहिले मिशन होते.
या प्रवासात गुंतवणूकदार मार्टी एलन, रियल इस्टेट दिग्गज मार्क हेगले, त्यांची पत्नी शेरोन, उद्योजक जिम किचन, जॉर्ज नील आणि कमर्शिअल स्पेस टेक्नोलॉजीचे संश्तापक गेस्ट प्रवासी गॅरी लाई हे सहभागी झाले होते.