फॉरेन टूरचं बुकिंग मग ते हुशारीनच करायला हवं !
By admin | Published: May 3, 2017 06:18 PM2017-05-03T18:18:31+5:302017-05-03T18:18:31+5:30
विदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं हेच माहीत नसेल तर
- अमृता कदम
विदेशात फिरायची हौस तर आहे, बजेटही मोठं आहे, पण त्यासाठी नेमकं कुठल्या वेळेला बुकिंग करायचं याची पुरेशा कल्पना नाहीये... खरंतर असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. क्रिकेटमध्ये टायमिंग शॉटला जे महत्व आहे, तसंच काहीसं प्रवासाच्या बुकिंगमध्येही आहे. बुकींगच्याबाबतीत योग्य वेळेला हिट केलं तर सिक्सर नाहीतर उगीचंच खिशाला खार लागला म्हणून पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे इतरांचं ऐकून, त्यांच्या अनुभवांवर अवलंबून राहून तिकीट बुकिंग करु नका.
अनेकांना तिकीट बुकिंगसाठी रिसर्च, नियोजन आणि प्रत्यक्षात बुकिंग करणं हे कटकटीचं वाटतं. त्यामुळे ते सरळ स्वत:ला ट्रॅव्हल एजंटच्या हातात सोपवून मोकळे होतात. पण तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी एका नामांकित संस्थेनं बुकिंगबद्दल केलेल्या रिसर्चची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरु शकते.