Barle Town: या घराचं किचन एका देशात अन् बेडरुम दुसऱ्या देशात, फक्त बेडवर कुस बदलताच बदलतात सीमा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:13 PM2022-02-18T16:13:48+5:302022-02-18T16:19:55+5:30

जगात अशी एक बॉर्डर (Country Border) अस्तित्वात आहे जी एका राहत्या घरांतून जाते. या बॉर्डरमुळे त्या घराचे दोन भाग पडतात. कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे.

border of two countries passes through house barle between Netherlands and Belgium | Barle Town: या घराचं किचन एका देशात अन् बेडरुम दुसऱ्या देशात, फक्त बेडवर कुस बदलताच बदलतात सीमा

Barle Town: या घराचं किचन एका देशात अन् बेडरुम दुसऱ्या देशात, फक्त बेडवर कुस बदलताच बदलतात सीमा

googlenewsNext

'बॉर्डर्स' (Borders) या दोन देशांना एकमेकांपासून विभाजित करतात. ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेल. भिंती, वायर्ड कंपाउंड, फ्लॅग्ज, चेकपोस्ट आणि गार्ड्स यासारख्या मानवनिर्मित खुणांचा वापर करून दोन देशांचा भूभाग एकमेकांपासून वेगळा केला जातो. बॉर्डर्सच्या मदतीनंच खंड, देश, राज्यं आणि शहरे यांच्यातील संबंध नियंत्रणात ठेवता येतात. जगातील काही देशांच्या आणि शहरांच्या बार्डर इतक्या विचित्र आहेत की, क्षणात तुम्ही दुसऱ्या देशात पाऊल ठेवू शकता. जगात अशी एक बॉर्डर (Country Border) अस्तित्वात आहे जी एका राहत्या घरांतून जाते. या बॉर्डरमुळे त्या घराचे दोन भाग पडतात. कदाचित या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे.

युरोपातील (Europe) बार्ले टाउनमध्ये (Baarle Town) हे असं अनोखं ठिकाण आहे जिथे तुम्ही एका देशात नाश्ता तयार करू शकता आणि दुसऱ्या देशात जाऊन खाऊ शकता. इतकंच नाही तर अवघी काही पावलं चालूनच तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकता.

युरोपातील बार्ले हे शहर नेदरलँड (Netherlands) आणि बेल्जियम (Belgium) या दोन देशांच्या सीमांदरम्यान वसलेलं आहे. या दोन देशांच्या सीमा बार्ले शहरातील अनेक घरांमधून जातात. त्यामुळे इथल्या लोकांना एक पाय नेदरलँडमध्ये तर दुसरा पाय बेल्जियममध्ये टाकता येतो. बार्ले शहराचा काही भाग नेदरलँड सरकारकडे तर काही भाग बेल्जियम सरकारकडे आहे. नेदरलँडकडे असलेला भाग बार्ले-नासाऊ (Baarle-Nassau) म्हणून ओळखला जातो तर, बेल्जियमजवळील क्षेत्राला बार्ले-हेरटॉग (Baarle-Hertog) म्हणतात.

सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही सीमारेषा फक्त पांढर्‍या क्रॉसनं (White Cross) चिन्हांकित केली गेली आहे. त्यामुळे येथील अनेक घरं, दुकानं, रेस्टॉरंटमध्ये पांढरे क्रॉस दिसतात. याशिवाय अनेक घरांमध्ये, पलंगांवरसुद्धा पांढर्‍या रंगाचे क्रॉस दिसतात. म्हणजेच बार्लेचे काही रहिवासी आपली कुस बदलाच दुसऱ्या देशात पोहचू शकतात.

डॉयच वेलेच्या (Deutsche Welle) मते, या बार्ले शहरात प्रत्येक गोष्टीला दोन-दोन नावं आहेत. शहराला, महानगरपालिका आणि पोस्ट ऑफिस यांनाही दोन नावं आहेत. मात्र, या सर्वांवर एकाच समितीचं नियंत्रण आहे. वेगळेपणामुळे आणि रंजक सीमारेषांमुळं हे शहर कायम चर्चेत असतं. एकूणच, बार्ले शहरातील रहिवासी क्षणार्धात एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचू शकतात. कारण, त्यांच्या घराच्या मधोमध दोन देशांच्या बॉर्डर आहेत. येथे असलेले अनेक कम्युनिटी हॉल, रेस्टॉरंट्स, कॅफे हाऊस अर्धे नेदरलँड्स आणि अर्धे बेल्जियममध्ये आहेत.बार्ले शरातून गेलेली बॉर्डर पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येतात आणि या अनोख्या बॉर्डरवर उभं राहून फोटोही काढतात.

Web Title: border of two countries passes through house barle between Netherlands and Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.